try another color:
try another fontsize: 60% 70% 80% 90%
प्रकाशन संस्था - रजत
आमच्या प्रकाशनाचे ब्रीदवाक्य

आमची प्रकाशन संस्था!

चाचणी मजकूर - सावंतवाडी तालुक्‍यात येतं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. याच परिसरात हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे. हिवाळ्यात तसंच पावसाळ्यात येथील अद्‌भुत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. याच सावंतवाडी तालुक्‍यातच पत्रादेवी इथे गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचं स्मारक आहे तर इथून जवळच बांदा या ठिकाणी बांदेश्‍वर व रामेश्‍वराची मंदिरं आहेत. संत सोहिरोबानाथांचं स्थान अशीही बांद्याची ओळख आहे.

पारगड हा किल्ला पाहायचा असेल तर तो बांद्यातून जवळ पडतो. पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मगाव तर देवगड तालुक्‍यातील कुणकेश्‍वर हे महादेवाचं मंदिर यादव राजांनी बांधलेलं. देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्‍वर मंदिराचा छत्रपती शिवरायांनी जीणोद्धार केला होता. पांडवही आपल्या अज्ञातवासाच्या काळात इथे येऊन राहिले होते अशी आख्यायिका आहे. कुणकेश्‍वर इथे येणारे पर्यटक लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळाने तिथेही एक प्रकल्प हाती घेतला आहे. कोकण पर्यटन करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने जसे दरवर्षी वेगवेगळे महोत्सव आयोजित करण्यात येतात तशाच नवनव्या पॅकेज टूर आयोजित करण्यात येतात.

स्थानिक माणसाला पर्यटकांकडून लाभ मिळावा, या दृष्टीने महामंडळाने मध्यंतरी निवास- न्याहारी योजना सुरू केली. या योजनेमुळे पर्यटकांना कमी खर्चात गावातील छान कौलारु घरांमध्ये राहता येतं आणि पर्यटकांच्या तिथे राहाण्या-जेवण्याने स्थानिक माणसाच्या खिशातही काही पैसे पडतात.